Ads Area

विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान; चाहत्यांनी दिला टोकाचा इशारा

https://maharashtratimes.com
 
विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान; चाहत्यांनी दिला टोकाचा इशारा
Jan 24th 2022, 06:46

केपटाउन: भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी वनडे ४ धावांनी गमावली. यामुळे भारतावर मालिका ३-० अशी गमावण्याची वेळ आली. तिसऱ्या लढतीत भारताकडून शिखर धवन, आणि दीपक चाहर यांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी सर्व जण दीपकच्या खेळीचे कौतुक करत आहेत. पण सामन्यात अशी एक घटना झाली ज्यामुळे सर्वजण संतप्त झालेत. वाचा- भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. विराटने एका पाठोपाठ एक टी-२० आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्याच बरोबर त्याचे वनडेचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. यामुळे विराट चर्चेत होता. पण आता तो अशा एका गोष्टीसाठी चर्चेत आलाय, ज्यामुळे देशातील अनेक चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडेच्या आधी राष्ट्रगीत सुरू असताना विराटने असे काही कृत्य केले ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. वाचा- प्रत्येक सामन्याआधी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत म्हटले जाते. भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीने जे कृत्य केले त्यावरून चाहते भडकले. राष्ट्रगीत सुरू असताना विराट चक्क च्युइंगम चगळत होता. विराटच्या या कृत्याने अनेक जण नाराज देखील झाले आहेत. काहींच्या मते हे कृत्य लाजिरवाणं आहे. काही चाहत्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावर अनेक जण तीव्र प्रतिक्रिया देखील देत आहेत. वाचा- राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहली मान खाली घालून उभा होता. तो राष्ट्रगीत देखील म्हणून नव्हता तर च्युइंगम चगळत उभा होता. विराटच्या या वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. एका चाहत्याने तर थेट टोकाची प्रतिक्रिया दिली आहे. विराट तुला जर बीसीसीआय आवडत नसेल तर तु पाकिस्तानमध्ये जा, असे संबंधित युझर्स म्हटलय. विराटने तिनही संघाचे कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. यानंतर देखील तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो.

You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.

If you no longer wish to receive these emails, you can unsubscribe from this feed, or manage all your subscriptions.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad