| 'विराट आणखी २ वर्षे कर्णधार राहिला असता, पण काहींच्या पचनी पडत नाही' Jan 24th 2022, 08:46  मुंबई : भारतीय क्रिकेट सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघाबाबत अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत, ज्यामुळे सर्व काही ठीक नसल्याचे दिसत आहे. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाची कामगिरी खालावत चालली आहे. पहिल्यांदा टी-२० विश्वचषक हरले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका आणि आता एकदिवसीय मालिकेतही मार खाल्ला. प्रशिक्षकपदावरून पायउतार झालेल्या रवी शास्त्रींनी आता पुन्हा एक वक्यव्य केले आहे, ज्याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा- १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील अष्टपैलू समालोचक म्हणून दीर्घकाळ क्रिकेटशी जोडले गेले होते, पण २०१७ मध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून आपली नवी इनिंग सुरू केली. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी कोहलीच्या ५-६ वर्षांच्या कार्यकाळातील कर्णधारपदाबाबतही सांगितले. यावेळी त्यांनी बीसीसीआयवरही निशाणा साधला, पण त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. वाचा- विराट आणखी दोन वर्षे राहू शकला असता कसोटी क्रिकेटमध्ये आणखी किमान दोन वर्षे कर्णधार राहू शकला असता. या फॉरमॅटमध्ये तो सध्याचा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे, असे शास्त्रींचे म्हणणे आहे. शास्त्री म्हणाले की, 'भारताला पुढील दोन वर्षांत घरच्या मैदानावर अनेक मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे ६० सामन्यांमध्ये ४० विजयांचा विक्रम ५०-६० विजयांचा झाला असता, पण कदाचित काही लोकांना हे पचनी पडणार नाही. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर त्याने अचानक राजीनामा दिला.' वाचा- ; पाहा काय म्हणाला... विराटसारखे विक्रम कुणाकडे नाहीत ओमानमध्ये सुरू असलेल्या लिजेंड्स क्रिकेट लीगच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले रवी शास्त्री म्हणाले की, 'आम्ही कोहलीच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. जगातील कोणत्याही संघाकडे असा कर्णधार नाही. तो दोन संघांचा एक स्टार फलंदाज आहे. विराट कोहलीने ५-६ वर्षे कसोटीत भारताचे नेतृत्व केले आणि त्या पाच वर्षांत भारत पहिल्या क्रमांकावर होता. असा विक्रम कोणत्याही भारतीय कर्णधाराकडे नाही आणि जगात असे विक्रम करणारे मोजकेच कर्णधार आहेत.' |