केपटाऊन: भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतकी खेळी केली. डी कॉकचे वनडे करिअरमधील हे १७वे तर भारताविरुद्धचे ६वे शतक ठरले. डी कॉक या महिन्यात ६ तारखेला बाप झाला होा. यासाठी त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मुलीच्या जन्मानंतर डी कॉक भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्यासाठी परत आला. वाचा- भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत द.आफ्रिकेने आधीच विजय मिळवला आहे. तिसऱ्या वनडेत डी कॉकने १३० चेंडूत १२ चौकार आणि २ चौकार मारले. शतक झळकावल्यानंतर डी कॉकची पत्नी साशाने इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. केपटाऊनमध्ये डॉ कॉकचे शतक पूर्ण होताच साशाने टीव्हीच्या समोर मुलीला घेत एक फोटो काढला. हा फोटो शेअर करताना तिने म्हटले की, वेल डन डॅडी (तुम्ही खुप छान खेळलात बाबा). या घटनेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. वाचा- डच्चू वाचा- डी कॉकने या शतकासह एक अनोखा विक्रम देखील स्वत:च्या नावावर केला. त्याने भारताविरुद्ध कमी डावात ६ शतक झळकावण्याची कामगिरी केली. डी कॉकने १६ डावात ही कामगिरी केली. भारताविरुद्ध सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने ८५ डावात ७ शतक केली आहेत. तर विकेटकीपर म्हणून वनडेत सर्वाधिक शतक करण्याबाबत आता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आज त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्टला मागे टाकले. या यादीत २३ शतकासह श्रीलंकेचा कुमार संगकारा अव्वल स्थानावर आहे. तसेच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध कमी डावात ६वे शतक करण्याबाबत डी कॉक आता अव्वल स्थानी आहे. याबाबत त्याने भारताच्या विरेंद्र सेहवागचा विक्रम मागे टाकला. सेहवागने २३ डावात न्यूझीलंडविरुद्ध ६ वे शतक केले होते.
You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.