Ads Area

Video : पंतने पुन्हा माती खाल्ली; विराट कोहलीनं दिली अशी तिखट रिअ‍ॅक्शन

https://maharashtratimes.com
 
Video : पंतने पुन्हा माती खाल्ली; विराट कोहलीनं दिली अशी तिखट रिअ‍ॅक्शन
Jan 24th 2022, 09:54

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ४ धावांनी जिंकला. २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २८३ धावांपर्यंत पोहोचू शकली आणि ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारतीय यष्टीरक्षक पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. वाचा- जेव्हा पंत फलंदाजीला आला, तेव्हा संघाची धावसंख्या १ बाद ११६ होती. पंत आणि कोहली ही जोडी चांगली भागीदारी करेल, अशी शक्यता वाटत होती, पण फेहलुकवायोच्या चेंडूवर पंतने क्रीजच्या दोन पावले पुढे येत ओव्हर डीप पॉईंटवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. आणि तिथंच फसला. सिसांडा मगालाने त्याचा सोपा झेल टिपला. पंतच्या या कृतीमुळे कोहली चांगलाच संतापलेला दिसत होता. वाचा- वाचा- रिषभ पंत पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले आणि तो पंतकडे पाहत उभा होता. खरे तर पंत अतिशय बेजबाबदार शॉट खेळून मैदानातून बाहेर पडला. संपूर्ण मालिकेत पंतच्या बॅटने तीन डावात ३३.६७ च्या सरासरीने एकूण १०१ धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात १७ आणि दुसऱ्या सामन्यात ८५ धावा केल्या. भारताचा ४ धावांनी पराभव लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था एक वेळ ७ बाद २२३ अशी दयनीय झाली होती. पराभवाचे सावट संघावर दिसत होते. यावेळी दीपक चहरने ३४ चेंडूत शानदार ५४ धावा करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. २७८ चा आकडा धावफलकावर दिसत असताना चहर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह (१२) आणि युझवेंद्र चहल (२) यांच्या विकेट ठरावीक अंतराने पडल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने जिंकलेला सामना जवळपास गमावला. वाचा- आफ्रिकेचा क्लीन स्वीप एकदिवसीय मालिकेतील एकही सामना भारत जिंकू शकला नाही आणि आफ्रिकेने भारताला ३-० असा क्लीन स्वीप दिला. २०२० नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाला ३ किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. २०२० मध्ये न्यूझीलंडने त्यांच्या घरच्या मैदानावर भारताचा ३-० असा पराभव केला.

You are receiving this email because you subscribed to this feed at blogtrottr.com.

If you no longer wish to receive these emails, you can unsubscribe from this feed, or manage all your subscriptions.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad